मालेगाव महानगरपालिकेत महास्वच्छता विशेष मोहिमेचा शुभारंभ
मालेगाव, ६ जानेवारी २०२४ : मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर विशेष महा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक ६ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मालेगाव येथे आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांच्या हस्ते महा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आयुक्त रविंद्र जाधव, उपायुक्त राजेंद्र फातले यांनी श्रमदान केले. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात दि. ६/०१/२०२४ ते दि. २६/०१/२०२४ पर्यंत महास्वच्छता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मालेगाव महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत. तसेच यामध्ये वार्डातील प्रतिष्ठत व्यक्ती, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी केले आहे.
या मोहिमेत आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, उपायुक्त राजेंद्र फातले, सहा.आयुक्त सचिन महाले, यांचेसह प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहम्मद यांचे सह वार्ड स्वच्छता निरीक्षक तसेच स्वयंसेवी संस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला.
आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी सांगितले की, महास्वच्छता विशेष मोहिमेच्या माध्यमातून शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येतील. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मनपाला सहकार्य करावे.
Comments
Post a Comment